आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या तीन बछड्यांचा ऊसमळ्याच्या आगीत अंत; जुन्नर तालुक्यातील ओझर येथील दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शॉर्टसर्किट झाल्याने उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या तीन बछड्यांचा होरपळून मृत्यू झाला.  ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी जुन्नर येथे घडली.   
 
जुन्नर तालुक्यातील ओझर येथे राजेंद्र जगदाळे यांचा ऊसमळा आहे. या ऊसमळ्यात एका बिबट्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला हाेता. रविवारी सकाळी शेतावरून जाणारी वीजवाहक तार पडून शॉर्टसर्किट झाले आणि मळ्याला आग लागली. वाऱ्यामुळे आग क्षणार्धात पसरली आणि छोट्या पिल्लांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. 


वन विभागाला कळवल्यावर वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे यांनी बिबट्याची दाेन मृत पिल्ले ताब्यात घेऊन आवश्यक ती कारवाई केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी पिलांचे शवविच्छेदन केले. ही दोन्ही पिल्ले मादी जातीची असून त्यांची वये अवघ्या एक महिन्याची होती. वन विभागाच्या उद्यानातच या पिलांचे दहन करण्यात आले. मात्र अकस्मात मृत्यूमुळे  मादी अस्वस्थ झाली असून तिसऱ्या पिलाच्या मृतदेहाजवळ ती बसून हाेती, त्यामुळे या पिलाचा मृतदेह ताब्यात घेणे वन विभागाला जमले नाही, अशी माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.


चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका वाघिणीचा मृत्यू
नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यात तळोधी वन परिक्षेत्रात  गंगासागर हेटी जंगल परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळून अाला. या वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. जवळपास ७ ते ८ दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. गेल्या महिन्यात  सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. 

बातम्या आणखी आहेत...