आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा मागे लागल्याने गर्भवती महिला मुलासह विहिरीत पडली;चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- घरात काैटुंबिक कारणावरून वादविवाद झाल्याने घराबाहेर पडलेल्या गर्भवती महिला व चार वर्षांच्या मुलामागे एक कुत्रा लागला. मात्र, कुत्र्याचा पिच्छा सोडवतानाच महिला व मुलगा विहिरीत पडल्याची घटना राजगुरूनगर परिसरात घडली. यात महिला सुखरूप असून तिच्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. जय हनुमंत शिंदे असे मृत मुलाचे नाव आहे. संगीता शिंदे असे महिलेचे नाव आहे.    


संगीता या मूळ बीडच्या रहिवासी असून नाेकरीच्या निमित्ताने पतीसह त्या राजगुरूनगर येथे राहतात. संगीता अाठ महिन्यांच्या गराेदर आहेत. संगीता यांचा पतीशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यामुळे त्या चार वर्षांच्या मुलासह गुरुवारी सायंकाळी घराबाहेर पडल्या. काही वेळ घराजवळील परिसरात फिरत असताना त्यांच्या पाठीमागे कुत्रा लागल्याने त्या शेताकडे पळाल्या. त्याच वेळी अंधारात त्यांना  शेतातील विहीर दिसली नाही. त्यामुळे त्या मुलासह विहिरीत पडल्या. यामध्ये जयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर संगीता विहिरीच्या कपारीवर बसल्या. स्थानिकांना ती विहिरीत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...