आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या तरुणाची पुण्यात गळफास घेऊन अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हॉटेल मालकाने धमकी दिल्याने नाशिकच्या तरुणाने  पुण्यातील बावधन येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. भारत बाळासाहेब ढेरिंगे (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पाेलिस ठाण्यात नरेंद्र तापकीर, उमेश शिंदे, वरुणराज शिंदे या अाराेपींविराेधात अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत अाराेपींविराेधात भारत याचे वडील बाळासाहेब ढेरिंगे (रा.पळसे, जि.नाशिक) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली अाहे. भारत याने डेक्कन जिमखाना येथील हाॅटेल वरुणराज सप्टेंबर २०१६ मध्ये चालवण्यास घेतले होते. त्यासाठी वेळाेवेळी संबंधित हाॅटेल मालकास त्याने ७५ लाख रुपये दिले. मात्र, मालकाने भारतसोबत करार न करता आणखी पैशांची मागणी केली. तसेच त्याचा मानसिक छळ करून हॉटेल खाली करण्याची धमकी दिली. त्यामुळे नैराश्यातून भारतने राहत्या घरी आत्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...