आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रवास सुलभ करण्यासाठी वरुण, रवीची ‘उड चलो’ मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कुठेही जाण्या-येण्यास समस्या उद्भवू नये म्हणून पुण्याचे वरुण जैन आणि रविकुमार यांनी प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचे नाव आहे-उड चलो. उड चलो ही संघटना वरुण आणि रवी हे दोघे चालवतात. ही संघटना लष्कर, नौदल, वायुदलाचे कर्मचारी, निमलष्करी दले, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या विधवांसाठी विमान प्रवासासाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देते. त्याचबरोबर निवृत्त जवान, त्यांचे कुटुंबीय आणि विधवांना पुन्हा रोजगार मिळावा यासाठी काम करते. उड चलोने आतापर्यंत ७० वर लोकांना नोकरी मिळवून दिली आहे. वरुण आणि रवी म्हणाले की, विमानातही रेल्वेच्या दरांतच तिकीट उपलब्ध असतात, पण लोकांना त्याची माहिती मिळत नाही. वरुण आणि रविकुमार हे दोघे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर आहेत. दोघेही २०१२ पासून असा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, ‘सशस्त्र दलांतील लोकांना आतापर्यंत एलटीसी क्लेमअंतर्गत थर्ड किंवा सेकंड एसीचे रेल्वेचे तिकीट मिळत होते. आता नव्या नियमांनुसार जर त्यांना विमान प्रवास करायचा असेल तर त्यांना भरपाई मिळू शकते. तीही थर्ड किंवा सेकंड एसीच्या दरावर. त्यामुळे आता त्यांना विमान प्रवासाचेही तिकीट मिळू शकते. हेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. आमचे रोजचे बुकिंग २५०० आहे.’  


उड चलोला कुठलेही अनुदान मिळत नाही. रवी आणि वरुण यांनी सैन्य पृष्ठभूमीच्या लोकांसाठी सवलतीच्या दरात विमान तिकीट देण्याची योजना सुरू केली तेव्हा काही विमान कंपन्यांशी चर्चा केली. हे दोघे सैनिकांसाठी काम करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर कंपन्यांनी त्यांची जी तिकिटे विकत नसत ती कमी दरात या दोघांना देणे सुरू केले. ही तिकिटे सैनिकांपर्यंत पोहोचवण्याने उड चलोची सुरुवात झाली. वरण-रवी म्हणाले की, आता ६ कंपन्या आमच्या भागीदार आहेत. त्यात जेट एअरवेज, गो एअर, स्पाइस जेट, एअर एशिया आणि एअर इंडिया यांचा समावेश आहे.  

 

पुनर्वसन केंद्रही चालवतात  
पुण्याच्या खडकी येथील पॅराप्लॅजिक रिहॅबिलिटेशन केंद्रात एक कस्टमर केअर सेंटर स्थापन केले आहे. मानेच्या खाले जे लोक पॅरालाइज होतात त्यांना पॅराप्लॅजिक म्हणतात. तेथेही उड चलोने अशा ७ माजी सैनिकांना नोकरी दिली. हे लोक दोन शिफ्टमध्ये कस्टमर केअर सेंटरमध्ये काम करतात.  

बातम्या आणखी आहेत...