आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज पुणेे न्यायालयाने फेटाळा आहे. डीएसके यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी मंगळवारी युक्तिवाद केला होता. त्यानंतर सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागितली होती. त्यानुसार गुरूवारी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आज न्यायालयाने डीएसके यांच्या जामिनावर निर्णय दिला आहे.


आर्थिक गुन्हा हा खुनापेक्षाही जास्त त्रासदायक असतो. पैशांच्या फसवणुकीत रक्त न सांडता कुटुंब उद्ध्वस्त होते. डीएसके यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांना 10 महिन्यांचा पगार मिळालेला नाही. अनेक वेळा मुदत देऊनही डीएसके 50 कोटी रुपये जमा करू शकले नाही; त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. असा व्यक्ती जर जामिनावर सुटली, तर ती काहीही करू शकते; पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे डीएसकेंना जामीन नाकारावा अशी विनंती सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली होती.

बातम्या आणखी आहेत...