आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार दीड तासाने कमी; हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ जवळपास दीड तासाने कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून त्यासाठी वेगळा हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. नवीन हायस्पीड कॉरीडॉर झाल्यास रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. 

 

 

रात्री चालणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रात्रीचा प्रवास कमी वेळेत व्हावा यासाठी हा हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. मार्गावर 200 ते 250 किलोमीटर ताशी वेगाने रेल्वे धावतील. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या कॉरीडॉर्सच्या निर्मितीसाठी काम करण्याचे आदेशही नुकतेच दिले आहेत. हा हायस्पीड मार्ग लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्याने त्याचे काम वेगाने होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील 10 हजार किलोमीटरचा टप्पा एप्रिल 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला हा पल्ला पार करण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. ही वेळ एक ते दीड तासाने कमी होण्याची शक्यता आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...