आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- फोर्ब्स इंडियाने 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या 30 यंग भारतीय अॅचिव्हरची यादी जारी केली आहे. यात पुण्यातील जान्हवी जोशी, नुपूरा किर्लोस्कर (एनजीओ-एंट्रेप्रेन्योरशिप) यांना स्थान दिले गेले आहे. या दोघी ब्ली टेक इनोवेशन्स नावाची एक एनजीओ व सोशल एंटरप्रेन्योरशिपची स्थापना केली आहे. या दोघींचे व त्यांच्या कंपनीचा उद्देश आहे की, बहि-या लोकांना संगीत आणि आवाजाचा फील येण्यासाठी एक घड्याळासारखे डिवाईस तयार केले आहे. अशी सुचली डिवाईस बनविण्याची कल्पना....
- पुण्यातील एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाईनची स्टूडंट जान्हवी आणि नुपूर सोशल इंटरप्रन्योर बनण्याचा प्रवास 2014 मध्ये सुरू झाला.
- दोघीही इंडस्ट्रियल डिझाईनच्या स्टूडंट होत्या. शिक्षण घेतानाच त्यांनी बहि-या लोकांसाठी अशा एका डिवाईसचा प्रोटोटाईप तयार केला ज्याच्या वायब्रेशनद्वारे संगीताचा आनंद घेता येईल.
- कॉलेजमध्ये मोठा प्रतिसाद मिळताच 2015 मध्ये दोघींनी ब्ली टेक इनोवेशन्स नावाची एक कंपनी सुरू केली आणि आपला प्रोटोटाईप डिवाईसला एका घड्याळ्याचे स्वरूप दिले.
असे काम करते हे डिवाईस-
- याला 'ब्ली वाच' असे नाव दिले आहे. याद्वारे बहि-या लोकांना संगीताची जाणीव करणारे व हातात घालण्याचे असे पहिले डिवाईस आहे.
- ब्ली वॉच डोरबेल, फायर अलार्म, मुलांचा रडण्याचा आवाज, प्रेशर कूकर, विसल आणि कुत्र्यांचा भुंकलेला आवाज हे डिवाईस रिकॉर्ड करते. तसेच ज्या व्यक्तीने हे डिवाईस हातात घातले आहे त्याला यूनिक वायब्रेशन पॅटर्न, कलर आणि आयकॉनद्वारे माहिती देते.
- हे घड्याळ इर्मजन्सी नंबरवर सुद्धा माहिती शेयर करते. या घड्याळाची बेसिक वर्जनची किंमत सुमारे 2500 हजार आणि स्मार्ट वॉच वर्जनची किंमत 5-7 हजार रूपये दरम्यान आहे.
- हे डिवाईस रेड क्रॉसशी संबंधित चॅरिटी ट्रस्ट इनेबल इंडिया आणि डेफ अॅंड युवा असोसिएशन ऑफ डेफकडून वितरित केले जात आहे.
नॅसकॉमकडून मिळाली आर्थिक मदत-
- ब्ली टेकचे इन्वेस्टर्स सोशल अल्फा आणि आयआयटी बॉम्बे आहे. याला नॅसकॉमकडून आर्थिक मदत मिळाली आहे.
- नुपूर-जान्हवीची कंपनी 'आस्क ब्ली' नावाची एक प्लॅटफार्म सुद्धा रन करते. या प्लॅटफॉर्मवरून आंधळी व बहिरी लोकांना साईन लॅंग्वेजमध्ये व्हिडिओ कंटेंट प्रोवाईड केला जातो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जान्हवी जोशी, नुपूरा किर्लोस्करचे काही निवडक फोटोज.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.