आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू;रुळ ओलांडताना झाला अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी- रेल्वेच्या धडकेत एका ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री सव्वासातच्या सुमारास घडली असून अद्याप मयत इसमाची ओळख पटलेली नाही. रेल्वे रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला आहे. अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या जवळ ५० वर्षीय इसम हा रेल्वे रूळ ओलांडत होता, तेवढ्यात इंद्रायणी एक्सप्रेस धावत मुंबईच्या दिशेने जात होती. रेल्वे आली आहे याची भनक न लागल्याने ५० वर्षीय इसमाला इंद्रायणी एक्सप्रेस ची जोरात धडक बसली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप इसमाची ओळख पटलेली नाही. मयत इसमाच्या अंगावर निळी पॅन्ट,काळे पांढरे पट्टे असलेला शर्ट आणि राखाडी रंगाचा बरमुडा घातलेला आहे. रंग निम गोरा उंची पाच फूट चार इंच. अस वर्णन रेल्वे पोलीस कर्मचारी निलेश मोहिते यांनी सांगितलं आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.