आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपीएससीच्या CDS परीक्षेत पुण्यातील श्रुती श्रीखंडे देशात पहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएसी)कडून घेतल्या जाणा-या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेत पुण्यातील श्रुती श्रीखंडे हिने मुलींत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून 232 विद्यार्थी पात्र झाले. त्यात श्रुती पहिली आल्याचे स्पष्ट झाले.

 

श्रुती श्रीखंडे हिचे वडील विनोद श्रीखंडे हे ब्रिगेडीयर आहेत. तर, आई गृहिणी आहे. श्रुतीने पुण्यातील आयएलएस कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. येत्या एप्रिल महिन्यात ती चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अॅकेडमीत तिचे प्रशिक्षण सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...