आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! व्हॅक्युम क्लिनर वापरताय..महिलेने गमावले केस; डोक्यावर पडले तब्बल 165 टाके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चाकण येथील औद्योगिक वसाहतीत राज्य-परराज्यातील हजारो कर्मचारी तुटपुंज्या पगारावर राबतात. पुरुषांसह महिलांना हवे तसे राबवून घेतले जाते. परंतु, एखाद्याला काही दुखापत झाल्यास त्याला अक्षरश: वार्‍यावर सोडले जाते. अशीच एक घटना नाणेकरवाडी येथील ओबीएसजी कंपनीत घडली आहे.

 

एका कामगार महिला काम करत असताना व्हॅक्युम क्लिनरमध्ये तिचे डोके जाऊन तिला गंभीर दुखापत झाली आहे. सीमा विश्वभंर राठोड (वय-25)  असे या महिलेचे नाव आहे. सीमाचे डोक्यावरील केस तर उडालेच  शिवाय तिच्या डोक्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रीयाही करावी लागली. सीमाच्या डोक्याला तब्बल 165 टाके पडले आहेत.

 

सूत्रांनुसार, सीमा राठोड ही महिला ओबीएसजी कंपनीत हेल्पर म्हणून काम करते. 8 डिसेंबरला ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. कंपनीत झाडू लावत असताना शेजारी असलेल्या व्हॅक्युम क्लीनरमधील फॅनचे हवेने तिचे डोके ओढले गेले. अक्षरश: केसांसह कपाळापासूनची कातळी हवेच्या ताबामुळे आत ओढली गेली. कंपनीतील इतर कर्मचार्‍यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने सीमाला बाहेर ओढून तिला तातडीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सीमाच्या डोक्यावर तब्बल 165 टाके पडले आहेत.

 

मॅनेजर, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकावर गुन्हा
ओबीएसजी कंपनीचा मॅनेजर, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. दुसरीकडे, उपचारासाठी कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे सीमाने सांगितले आहे. सीमाचे सीटी स्कॅन करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना कंपनीत चकरा मारल्या तरी देखील कंपनीकडून मदत मिळाली नाही.

 

याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...