आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LoveStory: भेटा पुण्यातील अनोख्या जोडप्याला, दोघांची अडचण एकच म्हणून केले लव्हमॅरेज!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कुटुंबातील सदस्‍यांची एकूण लांबी एकूण लांबी 26 फुटांपेक्षा अधिक आहे. - Divya Marathi
या कुटुंबातील सदस्‍यांची एकूण लांबी एकूण लांबी 26 फुटांपेक्षा अधिक आहे.

पुणे- प्रेमाचा उत्सव व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका अनोख्या जोडप्याची अजब- गजब कहाणी सांगणार आहोत. या जोडप्याची ओळख आपल्या ऊंचीमुळे देशातील सर्वात ऊंच पती-पत्नी म्हणून आहे. त्यांच्या मुलांची ऊंची सुद्धा सर्वांना कोड्यात टाकते. आपल्या 'ऊंची'मुळे या कुटुंबियांची 'लिम्का बुक ऑफ रिकार्ड्स' मध्ये नोंद झालेली आहे. 26 फूट आहे संपूर्ण कुटुबांची ऊंची....

 

- भारतातील सर्वांत उंच कुटुंब म्‍हणून कुलकर्णी कुटुंबाची नोंद आहे. शरद, संजोत, मुरुगा आणि सान्या अशा एकूण चार जणांचे हे कुटुंब आहे. 
- शरद आणि संजोत पती-पत्नी असून, मुरुगा आणि सान्या त्यांच्या मुली आहेत. 
- पुण्यात वास्तव्याला असलेल्या 58 वर्षीय शरद कुलकर्णी यांची उंची 7 फुट 1.5 इंच एवढी आहे. तर त्यांची 52 वर्षीय पत्नी संजोतची उंची 6 फुट 2.6 इंच आहे. 
- मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांची मोठी मुलगी मुरुगाची उंची 6 फुट असून, तिचे वय 29 वर्षे आहे. - धाकटी मुलगी सान्या आता 22 वर्षांची असून, तिची उंची 6 फुट 4 इंच एवढी आहे. 
- या चार सदस्‍यांच्या फॅमिलीची एकूण उंची 26 फुटांपेक्षा अधिक आहे.

 

इंटरेस्टिंग आहे याच्या लग्नाची स्टोरी-

 

- शरद कुलकर्णी आणि संजोत यांचे लग्‍न 1989 मध्‍ये झाले. त्‍यांच्‍या लग्‍नाची कथा खूप रंजक आहे. - 6 फुटांपेक्षा अधिक उंच असल्‍याने संजोत यांना स्‍थळच येत नव्‍हते. दरम्‍यान, एक दिवस त्‍यांच्‍या आजीने त्‍यांच्‍या घराजवळच्‍या भाजी मंडईत शरद यांना भाजी विकत घेताना पाहिले. 
- काहीच विचार न करता त्‍यांनी थेट शरद यांच्‍याकडे लग्‍नाचा प्रस्‍ताव ठेवला. पण, अनोळखी व्‍यक्‍ती नातीसोबत लग्‍न करण्‍याचे सांगत असल्‍याचे ऐकूण शरद यांना अवघडल्‍यासारखे झाले. 
- मात्र, जेव्‍हा आजींनी संजोत यांच्‍या उंचीबाबत त्‍यांना सांगितले त्‍यावर शरद हे या लग्‍नासाठी तत्‍काळ तयार झाले.

 

सर्वांत उंच जोडपे-

 

- देशातील सर्वांत उंच जोडपे म्‍हणून 'लिम्का बुक ऑफ रिकार्ड्स'मध्‍ये कुलकर्णी दाम्‍पत्‍याची नोंद आहे. - गिनीज बुकातही आपल्‍या या विक्रमाची नोंद होईल, अशी आशा त्‍यांना होती. परंतु, कॅलिफोर्नियाचे वॅन आणि लॉरी हॉलक्विस्ट हे जोडपे त्‍यांच्‍यापेक्षाही उंच होते. 
- त्‍या दोघांची एकूण उंची 13 फुट 4 इंच होती. त्‍यामुळे कुलकर्णी दाम्‍पत्‍याची गिनीज बुकात नोंद झाली नाही.

 

कार नव्हे स्कूटी आवडते-

 

- कुलकर्णी कुटुंबातील सदस्‍य कारऐवजी स्कूटीचाच वापर करतात. उंचीमुळे कार, ऑटोमध्‍ये बसणे त्रासदायक असल्‍याचे त्‍यांचे मत आहे. 
- या उलट शरद म्‍हणाले, 'माझी उंची अनेक वेळा माझ्या पथ्‍यावरही पडते. घरात लावलेला छताचा पंखा अगदी सहजतेने साफ करता येतो.

 

आता विश्‍वविक्रमाकडे डोळे-

 

- भारतातील सर्वात उंच कुटुंब म्हणून यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाची नोंद न झाल्यामुळे कुलकर्णी कुटुंब निराश झाले होते.
- मात्र लिम्का बुकमध्ये सर्वात उंच कुटुंब म्हणून नाव नोंदवण्यात आल्यामुळे हे कुटुंब खूप खुश आहे.
- जगातील सर्वांत उंच कुटुंब आणि जोडपे, हा विक्रम आपल्‍या नावावर करण्‍यासाठी कुळकर्णी कुटुंबाने पुन्‍हा एकदा 'गिनीज बुक ऑफ रिकार्ड्स'कडे अर्ज केला आहे. 
- या बाबत शरद कुलकर्णी म्‍हणतात, 'गिनीज बुकने जेव्‍हा आपली दखल घेणे टाळले त्‍यावेळी निराश झालो होतो. पण, आशा आहे की, एक ना एक दिवस हा विक्रम आमच्‍या नावावर होईल'

 

छायाचित्रांमध्ये पाहा, भारतातील सर्वात उंच कुटुंबाची ही झलक...

बातम्या आणखी आहेत...