आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी माहिती देणार आहोत. त्यांचे सुपूत्र गौरव बापट हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. सांगलीतील स्वरदा केळकर यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला आहे.
अशा जुळल्या रेशीमगाठी
स्वरदा या पुण्याच्या डीईएस लॉ कॉलेजध्ये त्या शिक्षणासाठी होत्या. त्यांंनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. याच कॉलेजमध्ये गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरवही शिक्षण घेत होते. कॉलेजला प्रवेश घेतल्यापासून दोघे एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबे राजकीय पार्श्वभूमी असलेली आहेत, त्यांची एकाच पक्षाशी म्हणजेच भाजपशी बांधिलकी आहे. त्यामुळे घरच्यांनीही त्यांच्या या विवाहाला पाठिंबा दिलेला आहे.
कोण आहेत स्वरदा केळकर?
-स्वरदा केळकर या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान भाजप नगरसेविका आहेत.
-त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच राज्य सरकारने बाल हक्क आयोगावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
-भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.