आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकर होते कट्टर नास्तिक, मांडले विज्ञानवादी विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकारांची प्रतिमा कट्टर हिंदूत्‍ववादी, सनातनी विचारांचे पाईक अशीच झाली आहे. परंतु, सावरकर यांचे विचार सुधारणावादी होते. संत गाडेबाबा बाबां प्रमाणेच त्‍यांनी हिंदू धर्मातील अनिष्‍ठ रुढी, परंपरा, यावर केवळ कडाडून टीकाच केली नाही तर कृतीही केली.  26 फेब्रुवारीला त्‍यांचा स्‍मृतीदिन. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार वीर सावकरांचे विज्ञानवादी विचार....

 


गाईस देव मानण्‍याचा गाढवपणा करू नये
मागील वर्षभरात देशभर गाईवरून वादंग उठले. परंतु, सावरकरांनी देश स्‍वातंत्र्यापूर्वीच या बाबत आपले झणझणीत विचार मांडले होते. आपल्‍या गाय- एक उपयुक्त पशू’ या लेखात ते लिहितात.. ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बल पशू आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये...कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चार्तुवर्ण व्‍यवस्‍थेचा घेतला समाचार.... आंतरजातीय विवाहांना समर्थनच नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह....सावरकरांना  ठरवले होते 'धर्मद्रोही'... सावरकरांनी काय दिले उत्‍तर....

बातम्या आणखी आहेत...