आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला एक किडनी, पतीची घटस्फाेटासाठी काेर्टात धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी सतत अाजारी असते, अशक्तपणामुळे सतत झाेपून राहते, घरकामात लक्ष देत नाही, अशा पतीच्या तक्रारी हाेत्या. त्यामुळे त्याने तिला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. डाॅक्टरांनी तिला थेट नऊ महिन्यांच्या गाेळ्या लिहून दिल्याने पतीला शंका अाली. मूल हाेत नसल्याने तिची साेनाेग्राफीही करण्यात अाली हाेती. पतीने तिच्या नकळत दुसऱ्या डाॅक्टरांना रिपाेर्ट दाखवला तेव्हा पत्नीला जन्मजात एक किडनीच नसल्याचे उघडकीस अाले. या कारणावरून वाद झाले. अखेर पतीने महिला साहाय्य कक्षाकडे अर्ज करत घटस्फाेटाची मागणी केली. पाेलिसांनी पतीचे समुपदेशन केले, मात्र ताेडगा न निघाल्याने अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले.  


कमला अाणि सतीश (नावे बदललेली अाहेत) यांचा जुलै २०१७ मध्ये विवाह झाला. सतीश हाही मजुरी अाणि वाहनचालक म्हणून काम करत चरितार्थ भागवत अाहे. कमला हिचे १२वी पर्यंत शिक्षण झाले असून ती घरीच असते. दाेघांचे लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच कमला घरात काम करीत नाही, अशक्तपणा असल्याचे सांगते, चिडचिड करत असल्याचे पतीला जाणवू लागले. त्यामुळे तिला त्याने रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले हाेते. तसेच लग्नानंतर चार-सहा महिने झाले तरी ती गर्भवती राहत नसल्यामुळे तिची साेनोग्राफीही करूनही घेण्यात अाली. मात्र संबंधित डाॅक्टरांनी नऊ महिन्यांच्या गाेळ्या लिहून दिल्या. पतीला न सांगताच ती नियमित गाेळ्या घेऊ लागली. मात्र एक दिवस गाेळ्यांचे माेठे पाकीट पाहून पतीला शंका अाली. त्याने विचारपूस केली, मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर पतीने तिचे साेनाेग्राफीचे रिपाेर्ट दुसऱ्या डाॅक्टरला दाखवले तेव्हा कमलाला जन्मापासून एकच उजव्या बाजूची किडनी असल्याचा खुलासा झाला. पत्नीने लग्नापूर्वी पत्नीने किंवा तिच्या माहेरच्या मंडळींनी याबाबत अापल्याला काहीच न सांगितल्याने सतीश संतप्त झाला. त्याने सासरच्या मंडळींकडे याबाबत जाब विचारला तेव्हा त्यांनी सतीशलाच दमदाटी केली. तसेच अामच्या मुलीस व्यवस्थितरीत्या सांभाळ असे सांगत धमकावले. पत्नीही अरेरावीची भाषा करू लागल्याने अखेर लग्नानंतर सहा महिन्यांतच पत्नीपासून घटस्फाेट घेण्याचे ठरवले.

बातम्या आणखी आहेत...