आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा पाठीमागे लागल्याने चार वर्षीय मुलासह गर्भवती आई पडली विहिरीत; मुलाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राजगुरूनगर येथे गर्भवती महिला आणि चार वर्षीय मुलगा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. जय हनुमंत शिंदे असे मृत्यू झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. तर संगीता हनुमंत शिंदे असे गर्भवती महिलेचे नाव आहे. महिला ही आठ महिन्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी चार वर्षीय जय हनुमंत शिंदे आणि गर्भवती आई संगीता शिंदे या शेजारीच असलेल्या मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी जयला शौचास आली. त्या थोड्या अंतरावर जयला घेऊन गेल्या, मात्र परत येते वेळेस त्यांच्या पाठीमागे कुत्रा लागला, संगीता आणि जय सैरावैरा धावत होते. त्याचवेळी अंधार असल्याने ते थेट विहिरीत पडले, यात जयचा मृत्यू झाला परंतु संगीता या रात्रभर विहिरीतील पाईप धरून होत्या. ही बाब काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती खेड पोलिसांना देण्यात आली, तातडीने घटनास्थळी येऊन एन. डी.आर.एफ.च्या साहाय्याने दोघांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु 12 तासांनी हे गूढ उलगडले आहे. हे कुटुंब मूळचे बीड येथील आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...