आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकुर्डी येथे रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आकुर्डी येथे रेल्वे अपघातात एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे, अशी महिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.

 

 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील रेल्वे किलोमीटर 170/31 येथे पहाटे अज्ञात रेल्वे गाडीने 35 वर्षीय महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे .ही घटना सकाळी सव्वा सहा वाजता समोर आली. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. मृत महिलेचा मृतदेह यशवंत चव्हाण स्मृती रूग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला आहे. मृत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे अंगावर पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस, केसांचा बॉब कट,रं ग काळा सावळा, उंची पाच फूट दोन इंच. या घटनेचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...