आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉनच्या मांजाने गळा कापला; जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सर्वोच्च न्यायालयाने  बंदी घातली असूनही वापरत असलेल्या चिनी नायलॉनच्या  मांजाने  गळा चिरला जाऊन गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार या महिलेचा  रविवारी सकाळी  उपचारादरम्यान  मृत्यू झाला. मुजुमदार या पुण्यातील दैनिकात जाहिरात विभागात कार्यरत होत्या. मांजा घातक असल्याचे वारंवार सिद्ध होत असूनही हा मांजा दुकानात विकला जात असून, मानवी जीवही त्यामुळे संकटात अाले अाहेत.


सुवर्णा या बुधवारी सायंकाळी  सातच्या सुमारास महापालिकेजवळच्या  शिवाजी पुलावरून दुचाकीवर जात असताना, पतंग काटलेला मांजा अचानक त्यांच्या  गळ्याभोवती गुंडाळला गेला. त्यात मांजामुळे  गळा चिरला गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारांना प्रतिसाद न देता त्यांचे  रविवारी सकाळी निधन झाले. मुजुमदार यांच्या  मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या  मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचाा  गुन्हा दाखल करण्याची मागणी होत अाहे.

बातम्या आणखी आहेत...