आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दुचाकीवरील महिलेचा मांजाने गळा चिरला; रक्ताची लागली धार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा पतंगाच्या मांजाने गळा कापल्याची घटना बुधवारी सायंकाळी शिवाजी पुलाजवळ घडली. यामध्ये महिलेचा गळा चिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

 

 


सुवर्णा मुजुमदार (रा. सिंहगड रोड) असे जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजुमदार या बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलाकडे शनिवारवाड्याकडून दुचाकीवर जात होत्या. त्या वेळी मांजा गळ्याभोवती गुंडाळून गळा कापला गेला. त्यामुळे त्या रस्त्यावर खाली पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...