आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खेड तालुक्यातील मांजरेवाडीत तलवारीने केक कापल्याने 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेड परिसरातील मांजरेवाडीमध्ये एका तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याने गावातील पोलिस पाटलांनी या तरुणाविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाच जणांवर खेड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ओमकार विजय टाकळकर (वय-22) याचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी अनेक मित्र उपस्थित होते. ओमकार टाकळकर याने तलवारीने केक कापला. त्याचे फोटो मित्रांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले. हे फोटो त्यांनी दुसऱ्या मित्रांना व्हॉट्सअपवर पाठविले. त्यामुळे ते व्हायरल झाले. पोलिस पाटील यांनी देखील इतरांच्या मोबाईलमध्ये तलवारीने केक कापल्याचे फोटो पाहिले. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केल्याने पोलिस पाटील प्रमोद भगवान मांजरे यांनी खेड पोलिसात फिर्याद दिली आहे. यात ओमकार विजय टाकळकरसह नंदकुमार विठ्ठल मांजरे, अक्षय दत्तात्रय मांजरे, गणपत विठ्ठल मैराळे, स्वप्नील मोहन मांजरे, बाळासाहेब विठ्ठल मांजरे या तरुणांवर शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप तरुणांना अटक करण्यात आलेली नाही.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...