आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड: ड्रेनेजचे काम करताना 2 कर्मचारी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले, एकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड -  दिघी मधील चव्ह्रोली परिसरात ड्रेनेजचे काम करणारे दोन कर्मचारी कामादरम्‍यान मातीच्‍या ढिगा-याखाली दबल्‍याची दुर्घटना घडली. या घटनेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा कर्मचारी जखमी झाला आहे. बापू अस मृत कर्मचा-याच नाव आहे. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अद्याप समजू शकते नाही. आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.


पावसामुळे ड्रेनेजमध्‍ये गेली माती 
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने चऱ्होली परिसरात ड्रेनेज आणि रस्त्याचे काम सुरू होते. ड्रेनेजचे काम करण्यासाठी दोन कर्मचारी ड्रेनेजच्या आत उतरले होते. पोकळे आणि जेसीबीच्या मदतीने ड्रेनेजच्या आतील माती बाहेर काढली गेली. मात्र पावसामुळे माती पुन्‍हा हळू हळू ड्रेनेजच्या आता घसरली. यामुळे दोन्‍ही कर्मचारी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्‍ही कर्मचारी परप्रांतीय असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अद्याप दोघांची पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळाचे फोटो...  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...