आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HSC, SSC Results: निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, सोशल मीडियातील तारखा या अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च 2018 दरम्यान घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाची कोणतीही तारीख मंडळाने अद्याप जाहीर केली नाही. मात्र मंडळाच्या बोधचिन्हाचा (लोगो) वापर करून काही समाजमाध्यमांवर निकालाच्या वेगवेगळ्या तारखा प्रसारित केल्या जात आहेत. या अनधिकृत तारखांवर     विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये. निकालाची अधिकृत तारीख मंडळाच्या संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...