आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी अज्ञातांकडून 17 वाहनांची तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा तोडफोडीचे सत्र सुरू झाले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थेरगाव व वाकड परिसरासह पिंपरतील संत तुकारामनगर येथे एकून 17 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणाही ताब्यात घेण्यात आलेली नाही. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातील रस्त्यालगत पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी धारदार शस्त्राने वाहने फोडल्याचा प्राथमिक अंदाज वाकड पोलिसांनी वर्तविला आहे. अशोक वसाहत आणि आनंद रुग्णालयाच्या रस्त्यालगतच्या एकूण 10 वाहने फोडली तर, पिंपरी हद्दीत असलेल्या संत तुकारामनगर येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील अज्ञात इसमांनी दगडाच्या साहाय्याने सात चारचाकी वाहने फोडली आहेत. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप या दोन्ही घटनेप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.

 

पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, कशी केली आहे वाहनांची तोडफोड...

बातम्या आणखी आहेत...