आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड स्मार्ट शहर खड्यात; रस्‍त्‍यांवर तब्बल 2379 खड्डे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड - एकीकडे शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्‍त असताना पिंपरी चिंचवड पालिकेने शहरात तब्बल 2 हजार 379 खड्डे असल्‍याची माहिती देत त्‍यापैकी 2 हजार 30 खड्डे बुजवल्‍याचा दावा केला आहे. शहरातील 85 टक्‍के खड्डे बुजवले असून 349 खड्डे बुजवण्‍याचे काम सुरू आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्‍यात आले आहे. 'क' क्षेत्रीय कार्यालय परिसरात सर्वाधिक 675 खड्डे असून 'अ' प्रभागात सर्वाधिक कमी 99 खड्डे आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. बुधवारी महापालिकेच्‍या दालनात विरोधकांनी घोषणाबाजी करत खड्डे बुजवण्‍याची मागणी केली होती. 

 

एकीकडे प्रशासन खड्डे बुजविण्याचा दावा करत असले तरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे सर्रास खोदकाम सुरू आहे. ज्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात ज्या ठिकाणी खड्डे आढळतील तेथील संबंधित अधिका-यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे.

 

शहरातील काहीं परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्‍यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. कमकुवत रस्ते असल्यामुळे भर रस्त्यात खड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्‍यामुळे प्रशासनाच्‍या दाव्‍यानंतरही सुनियोजित आणि स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवड शहर अक्षरशः खड्यात गेल्‍याचे चित्र आहे. 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...