आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरीचे आमिष देऊन भाजप पदाधिकाऱ्याकडून 30 कोटींची फसवणूक; उमेदवारांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

 पुणे- शासकीय नाेकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करून भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबईचा महामंत्री जितेंद्र बंडू भाेसले यांनी राज्यभरातील हजाराे तरुणांना गंडा घातल्याचे  उघडकीस आले अाहे. अातापर्यंत सुमारे  ८०० जणांना नाेकरीचे आमिष दाखवून ३० काेटी रुपयांना भोसलेने गंडा घातल्याचा अाराेप माजी सैनिक विकास परिषदेचे सुधाकरन पणीकर यांनी पत्रकार परिषदेत केला अाहे. या वेळी फसवणूक झालेले सारिका चव्हाण, मधुकर भाकरे, अाेमप्रकाश जाेशी हे उपस्थित हाेते. पणीकर म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी सरकारी नाेकरी लावताे, असे सांगून भाेसले याने पुण्यातील नामांकित बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय येथे कार्यालयात मुलाखती घेऊन तेथील सूचना फलकावर अाणि बनावट संकेतस्थळावर संबंधित उमेदवारीची यादी केली. तसेच त्यांना बनावट नियुक्तिपत्र देऊन राज्यातील हजाराे तरुण, तरुणींना ३० कोटी रुपयांना गंडा  घातला.  संबंधित फसवणूक झालेल्यांनी वेळाेवेळी जितेंद्र भाेसले यांची भेट घेऊन विचारणा केली असता, त्याने अनेक मंत्री व अधिकाऱ्यांचे  नाव घेऊन त्यांना धमकावले.   


बीडच्या भाकरेंच्या डाेक्याला लावले पिस्तुल 
बीड जिल्ह्यातील केज येथील मधुकर भाकरे यांनी सांगितले, जितेंद्र भाेसले यांची पत्नी स्मिता भाेसले त्यांचे चार अंगरक्षक हे देखील यात  सहभागी अाहेत. अातापर्यंत माझी दाेन काेटी २७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात अाली अाहे. भाेसले याच्याकडे पैसे परत मागण्यास गेले असता त्याने बंद खात्याचे चेक देऊन फसवणूक केली. त्याविषयी चाैकशी करण्यास गेल्यावर त्याने तुम्हाला पैसे देताे, असे सांगून गाडीत बसण्यास लावले. तसेच अज्ञातस्थळी नेऊन जबर मारहाण करत त्याच्याजवळील पिस्तूल काढून जिवे मारण्याची धमकी दिली.  

बातम्या आणखी आहेत...