आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 36 बांगलादेशींना अटक, बनावट दस्‍ताऐवज ताब्‍यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्यापैकी काही जणांकडून बनावट दस्तऐवज सापडलेे.    


बारामती, यवत, माळेगाव, दौंड तसेच आसपासच्या तालुक्यांच्या परिसरात बरेच बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली   होती.  त्यावरुन एटीएस  व स्थानिक पोलिसांनी  ही कारवाई केली.   शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना या संदर्भात अलर्ट देण्यात आले होते. त्यानुसार बांगलादेशींसह परराज्यातून आलेले धर्मप्रसारक तसेच इतर काही व्यक्तींची पोलिसांच्या पथकाने सखोल चौकशी सुरू केली. ३६ बांगलादेशी नागरिक बेकायदा देशात वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले.

 

या नागरिकांकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, बांगलादेशातील जन्माचा दाखला, भारतातील जन्माचा बनावट दाखला व धार्मिक साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी बरेच जण बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बिहार येथून आल्याची बतावणी करत हाेते.

बातम्या आणखी आहेत...