आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: 1981 मध्ये बलात्काराचा प्रयत्न, 36 वर्षानंतर माजी नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील एका बिझनेसमनने आपल्यावर 1981 साली बलात्काराचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार भाजपच्या माजी नगरसेविका रिजिना गायकवाड यांनी पोलिसांत केली आहे. औंधमध्ये राहणा-या गायकवाड यांनी तब्बल 36 वर्षानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. 1981 मध्ये आपण शिक्षण घेत असताना बोपोडी येथील एका कंपनीत रिसेप्निस्ट म्हणून नोकरी करत होतो त्यावेळी ही घटना घडल्याचे गायकवाड यांचा दावा आहे. खडकी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, कोटकर ऑटोमोबाईल्सचे मालक अतुल कोटकर यांनी आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

 

गायकवाड यांनी दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी त्यावेळी माझे आई-वडिल, मोठी बहिण आणि लहान भावासोबत राहत होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी गायकवाड यांनी दहावीनंतर शिक्षक प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मी सांगवीतील एका कंपनीत काम करू लागले. ऑगस्ट 1981 मध्ये मी नोकरी बदलली आणि बोपोडीतील कोटकर ऑटोमोबाईल्स येथे रिसेप्निस्ट म्हणून काम करू लागली. सध्या कोटकर ऑटोमोबाईल्स डेक्कन येथे शिफ्ट झालेले आहे.

 

वयाच्या 26 व्या वर्षी नगरसेविका बनलेल्या 54 वर्षीय गायकवाड यांनी पुढे तक्रारीत म्हटले आहे की, मी तेथे रिसेप्निस्ट म्हणून रूजू झाले होते पण माझ्याकडून स्वच्छतेपासून इतर सर्व कामे करून घेतली जात होती. यादरम्यान अतुल कोटकर मला कधी कधी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेत तसेच बाहेर येण्यास सांगायचे. मात्र मी नकार द्यायचे. सप्टेंबर 1981 मध्ये एका रविवारी मला त्यांनी खडकीतील जयहिंद थिएटरवर येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या बाईकवर बसवून एका अज्ञात टेकडीवर नेले. मला कुठे आणले आहे याची माहिती नव्हती नंतर कोटकरने मला ही हनुमान टेकडी असल्याचे सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, आणखी काय काय म्हटले आहे गायकवाड यांनी तक्रारीत, कोटकर यांचे काय म्हणणे आहे तर पोलिसांनी काय घेतली भूमिका?....

बातम्या आणखी आहेत...