आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये 4 प्रश्न चुकले, विद्यार्थ्‍यांना 7 गुण देण्‍याची शिफारस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ पुणे - इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत ४ प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे  विद्यार्थ्यांना ७ गुण देण्याची शिफारस अभ्यास मंडळाच्या बैठकीत झाली आहे. २८ फेब्रुवारीला रसायनशास्त्राचा पेपर हाेता. पेपर सेटिंगच्या वेळी मुद्रितशाेधनात
दुर्लक्ष केल्याने चार प्रश्नांत चुका झाल्याचे शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनीही मान्य केले.


दरम्यान, या पेपरमधील चुकीच्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्याबाबतचा निर्णय बुधवारी घेण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. या प्रकरणाची सविस्तर चाैकशी केली जात असून मंडळाने सेकंड अाेपिनियनचा मार्गही खुला ठेवला अाहे.

बातम्या आणखी आहेत...