आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या 176 बँक खात्यांतून पोलिसांनी जप्त केले 43 काेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अार्थिक गुन्हे शाखेने  त्यांची बँक खाती गाेठवली अाहेत. डीएसके यांच्या २७६ बँक खात्यांत पाेलिसांना ४३ काेटी नऊ लाख रुपये बुधवारी जप्त केले. दरम्यान, अातापर्यंत डीएसके यांच्याविराेधात सुमारे साडेचार हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या असून फसवणुकीचा अाकडा ३०० काेटींपर्यंत गेला अाहे. त्यामुळे डीएसके यांनी जमा केलेले पैसे नेमके कुठे ठेवले अथवा काेणत्या ठिकाणी गुंतवले याचा उलगडा अद्याप झालेला नाही.   


वेगवेगळ्या बँकांकडून डीएसके यांनी दाेन हजार ८९२ काेटी रुपयांचे कर्जही घेतले असून त्याची परतफेडही करण्यात अाली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांना गुंतवणूकदारांची देणी परत करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात ५० काेटी रुपये भरण्यास सांगितले हाेते. तीन वेळा मुदतवाढ मिळूनही डीएसके सदर पैसे न्यायालयात भरू शकले नाहीत. अखेर न्यायालयाने डीएसके यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

बातम्या आणखी आहेत...