आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कॅश व्हॅनच्या कर्मचा-यावर भरदविसा हल्ला, 25 लाखांची रोकड पळवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील निगडीतील यमुनानगर मध्ये एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचा-यावर वार करून भरदिवसा 25 लाखांची रोकड असलेली पैशांची बॅग चौघांनी पळवली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. हा दरोडा परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.  जखमी कर्मचा-याला उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी (एमएच 02 एक्सए 4699) व्हॅन आली होती. पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना कशी व्हॅन कर्मचारी महेश पाटणे (रा. हडपसर ) याच्यावर  तेथे आलेल्या चौघांनी वार केले. त्याला जखमी करून पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. या महेश कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. एक अॅक्टिव्हा व पल्सर दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ही बॅग पळविली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...