आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: हडपसर येथील मदरशामधून सहा मुले बेपत्ता; सर्वजण बिहारचे रहिवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हडपसर परिसरातील मदरशातून सहा मुले बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही मुले मदरशातून मैदानावर खेळत असताना बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडली होती. मात्र, ती परत मदरशात तसेच घरी परतली नाहीत.   


सहमद आसार उद्दीन रजा (१३), अन्ना महंमद आजाद शेख(१२), अहसान निजाम शेख (१५), शाहनवाज जमालुउद्दीन शेख(१६), अन्वरुल इसराइल हक(१३) आणि  रिजवान आलग सलमुद्दीन शेख  (१५, सर्व. रा.बिहार) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.  

 
याप्रकरणी मोहंमद अबू तालीब शब्बीर आलम शेख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सय्यदनगर येथील दारूल उलूम चिस्तिया जलालिया  मदरशामध्ये ही सहा मुले दाखल झाली होती. फिर्यादीने त्यांना याआधी दाखल झालेल्या तीन मुलांसोबत तीन जुलै रोजी सायंकाळी खेळायला नेले होते. थोड्या थोड्या वेळाने ही सर्व मुले बाथरूमला जायचे असल्याचे सांगून बाहेर पडली. यानंतर ती मदरशामध्ये गेली.  तेथून स्वत:चे सामान घेऊन कोणालाही काही न सांगता निघून गेली आहेत. यानंतर ती मदरशात तसेच घरी परत आली नाहीत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्व मुलांचे फोटोज व पोलिस स्‍टेशनमध्‍ये नोंदविण्‍यात आलेली तक्रार... 

बातम्या आणखी आहेत...