आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- खेळताना गळफास लागल्याने आठ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू, आठ दिवसांनी होती मुंज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात घरात खेळता खेळता मुलाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता समोर आली आहे. नकुल कुलकर्णी (वय-8) असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुलला इलेस्टिकशी घरात खेळता- खेळता  गळफास लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला. घरातील आज्जी आजोबा बाहेरच्या हॉल मध्ये बसले होते पण त्यांच्या लक्षात आले नाही.  नकुलची काही दिवसांनी मुंज होती त्यामुळे मुंजीचे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर गेले होते. तेव्हा नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलेस्टिक सोबत तो खेळत होता. खेळत खेळत याच इलेस्टिक मध्ये त्याला गळफास लागला आणि मृत्यू झाला. दुपारी बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी त्याला आवाज दिला मात्र प्रतिसाद न दिल्याने अखेर दाराचे लॉक तोडण्यात आले, तेव्हा इलेस्टिक मध्ये गळफास लागलेला मृतदेह आढळून आला. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...