आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : भाजपाध्यक्ष अमित शहांनी घेतले तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही होती. 

 

अमित शहा हे देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्यासह दुपारी पुण्यात पोहोचले. पुण्यात पोहोचल्यानंतर सर्वात आधी अमित शहांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले तर त्यानंतर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


शनिवारी सकाळी आकुर्डी येथून प्रथम तुकोबांच्या पालखी सोहळ्याने पुण्याकडे वाटचाल सुरू केली. तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३३३ वे वर्ष आहे आणि एकूण ३३१ दिंड्यांचा पालखी सोहळ्यात समावेश आहे. सायंकाळी तुकोबांचा पालखी सोहळा वाकडेवाडी परिसरात दाखल झाला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुणेकरांच्या वतीने पालखीचे स्वागत केले.

 

 

पंढरीस निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेत रमले पुण्यातील अाबालवृद्ध 
पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत विसावल्या असून, वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा सेवांचा लाभ मिळावा, यासाठी पुणेकर झटत आहेत. रविवारी शहरातील सर्व मंदिरे, शाळा, मैदाने,खासगी मिळकती आणि उद्याने वारकऱ्यांच्या चमूंनी व्यापली हाेती. सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी न्याहारी, भोजन, उपवासाचे पदार्थ, फळे,चहा यांचे वाटप सुरू आहे. विसावलेल्या वारकऱ्यांच्या जथ्थ्यांमधून निनादणारे अभंगांचे, टाळ-मृदंगांचे-वीणेचे सूर शहराला भक्तिमय वातावरण प्राप्त करून देत आहेत. 


रविवारी पहाटेपासूनच शहरातील नागरिक, विविध संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी साश्रू सेवा, मालीश, सलून सेवा देण्यात आली. विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, रक्तशर्करा, दंत तपासणी, स्त्रियांची तपासणी..असे उपक्रम राबवण्यात आले. वारकऱ्यांच्या चपला-पादत्राणांच्या दुरुस्तीचीही सेवा करण्यात आली. पखवाज, मृदंगांच्या वाद्य, शाई यांचेही काम करण्यात आले. 


अवयवदान जागृती 
आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येत रविवारी वारकऱ्यांमध्ये अवयवदान मोहिमेची जागृती करण्याचे कार्य केले. अवयवदान म्हणजे काय, कोणते अवयव दान करता येतात, कोण अवयवदाता बनू शकतो, प्रक्रिया काय व कशी असते..अशा वारकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अवयवदान चळवळीची माहिती दिली. 


दरम्यान, साेमवारी पहाटेच दाेन्ही पालख्या पुण्यातून पुढच्या प्रवासाला निघणार अाहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळीच दिवेघाटाचा अवघड मार्ग चढून सासवड गावात मुक्काम करणार अाहे. या प्रवासात अनेक वारकरी 


प्लास्टिकला मुक्ती, पत्रावळींचा वापर लक्षणीय 
प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरची ही पहिलीच वारी होती. लक्षावधी वारकऱ्यांच्या न्याहारी, भोजनासाठी व चहासाठी प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचे व थर्माकोलचे ग्लास, ताटे, वाट्या, चमचे यापूर्वी वापरले जात असत. यंदा मात्र जेवण, न्याहारी, चहा यासाठी पत्रावळी, द्रोण, काचेचे - स्टीलचे ग्लास असा बदल दिसून आला. पाऊस पडत असताना मात्र इरल्याप्रमाणे वापरले जाणारे प्लास्टिक अद्याप कायम असल्याचे चित्र दिसले. 

बातम्या आणखी आहेत...