आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चिमुरड्याला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून नाल्यात फेकण्याचा प्रयत्न, व्हिडिओ झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी- बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलाला जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्ये बसवून त्याला नाल्यात टाकण्याचा प्रयत्न करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचे जेसीबी चालक या सगळ्यांचे शुटिंग करीत मुलाला भीती दाखवत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. लहान मुलाच्या जीवाशी खेळणा-या जेसीबी मालक व चालकाविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

 

दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडून नागझरी नाल्याच्या सफाईचे काम सुरु होते. दरम्यान या ठिकाणी सार्थक लिंबोणे हा मुलगा खेळता खेळता बाॅल गेल्याने आणण्यासाठी गेला होता. जेसीबी मालकाने हळूच येऊन त्याला जेसीबीच्या बकेटमध्ये उचलले आणि नाल्यात फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सार्थक प्रचंड भेदरून गेला होता. यावर कळस गाठत जेसीबी चालकाने या सर्व प्रकाराचं मोबाईलमध्ये शुटिंग केले. 

 

भेदरलेलेल्या सार्थकने दोन दिवस घरी काहीही सांगितले नाही. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती उघड झाली. त्यामुळे  संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलाच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती, असे संतप्त प्रश्न पालकांनी केला आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...