आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पु.ल.देशपांडेंच्या घरी चाेरी करणारा अटकेत, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झाली होती चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लेखक स्व.पु.ल.देशपांडे यांच्या घरी व फर्ग्युसन काॅलेजचे चेअरमन विकास काकतकर यांच्या घरी चाेरी झाल्याची घटना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात घडली हाेती. याप्रकरणी सात महिन्यानंतर पोलिसांनी जितसिंग राजपालसिंग टाक (२४,रा.हडपसर,पुणे) याला अटक केली असून त्याने चाेरी केल्याची कबुली दिली अाहे. दरम्यान, पु.ल.देशपांडे यांच्या घरी केवळ पुस्तकांचा खजिना असल्याने चोरट्याला हात हलवत परतावे लागले हाेते. 


गुन्हे शाखेचे पाेलिस कर्मचारी प्रशांत गायकवाड हे गेल्या एक महिन्यापासून याप्रकरणाचा तपास करत हाेते. त्यांना माहिती मिळाली हाेती की, निगडी येथे या प्रकरणातील आरोपी जितसिंग टाक हा क्रिकेट खेळत अाहे. त्यानुसार पाेलिसांनी त्याला अटक केली. जितसिंग टाक याने सात महिन्यापूर्वी साथीदार स्वपनील रणदिवे ऊर्फ चाेर दाद्या, गणेश राठाेड, करणसिंग रजपुतसिंग दुधानी (रा.डडपसर,पुणे) यांच्यासह जंगली महाराज राेड, डेक्कन पुणे येथे रात्रीच्या वेळेस घरफाेडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पाेलीसांनी घरफाेडीतील एकूण एक लाख ६५ हजार रुपयांचे ५५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...