आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला शिवी देणे पडले महगात, मित्रानेच केला मित्राचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मावळ- किरकोळ कारणावरून झालेल्या वादतून एक जणाने मित्राच्याच डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्या लगत घडली. अनिल पानसरे (वय-३२) असे खून झालेल्या मित्राचे नाव असून, राकेश मौर्य असे आरोपी मित्रांचे नाव आहे. घटनेच्या चार तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत अनिल पानसरे (वय-३२ रा.कृष्णगाव, कसबे वस्ती, ता.वणी, जि.नाशिक) आणि आरोपी राकेश मौर्य (वय-२८, रा.वराळे,ता.मावळ,जि.पुणे) हे दोघे मित्र होते. रविवार दुपारी त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि ते मिटलेही. त्यानंतर दोघेही हॉटेलमध्ये जाऊन दारू पित होते यावेळी दारू पित असताना अनिल पानसरे याने आरोपीच्या बायकोला शिवीगाळ केली होती. याचाच राग मनात धरून राकेश मौर्य ने सिमेंटचा गट्टू अनिलच्या डोक्यात घेतला यात अनिलच्या जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला. परंतु, काही तासातच तळेगाव पोलिसांनी आरोपी राकेशला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...