आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळेगाव- चाकण रस्त्यावर ट्रॅकची दुचाकीला धडक, नाशिकच्या युवकाचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव- चाकण रोडवरील इंदोरी येथे आज (शुक्रवार) सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. या अपघातात 1 जण ठार झाला आहे. सारंग सुधीर दाणी (वय-19 रा. नाशिक घोटी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

मिळाल्या माहितीनुसार, तळेगाव- चाकण रस्त्यावर आज सकाळी ट्रॅक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या मध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सारंग हा दुचाकी वर जात असताना ट्रकची धडक बसली आणि यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस करीत आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या अपघातातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...