आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील ससून रुग्णालयातून बलात्काराचा आरोपी पळाला, गार्डची नजर चुकवून साधली संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ससून रुग्णालयातून बलात्काराच्या आरोपीने गार्डची नजर चुकवून पळ काढल्याचा प्रकार रविवारी घडला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असून या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अक्षय संतोष लोणारे (वय 21, पोकळेमळा कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.त्यामुळे त्याला अटक करुन येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला तपासणीसाठी ससून हाॅस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मुख्यालयातील गार्डसोबत तो ससूनमध्ये होता. रविवारी सकाळी अक्षयने हातातील बेडी काढून तेथून धूम ठोकली. गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याचा युद्धपातळीवर शोध सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...