आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बालगंधर्व परिवाराच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला आहे. 

 

बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण २५ जून रोजी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. उद््घाटन कार्यक्रमासाठी महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अभिनेते सुबोध भावे, सुशांत शेलार, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित राहतील. 

बातम्या आणखी आहेत...