आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: येडीयुरप्पांनी सर्वात कमी दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी आपल्या राज्यात मोठ्या कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषविले पण भाजपच्या येडीयुरप्पा यांनी सर्वात कमी दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या कर्नाटकमधील कार्यपद्धतीबाबत टीका केली.

 

राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी पुण्यात राष्ट्रीय मेळावा होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कर्नाटकात जे काही घडले ते सा-या देशाने पाहिले. भाजपला तेथे सत्तेची फारच घाई झाली होती. पण काँग्रेस व जेडीएसने चलाखी दाखवत भाजपला जशास तसे उत्तर दिले. तरीही भाजपने घटनेचे उल्लंघन करत सरकार स्थापन केलेच पण सुप्रीम कोर्टाने त्यांना चपराक दिली. समजा हे प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेले नसते तर तेथे आता वेगळीच चित्र दिसले असते, असेही अजित पवार म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकमध्ये सरकार हवे होते. तशा सुचना त्यांनी स्थानिक खासदारांना दिल्या होत्या. तसेच आपलंच सरकार असले पाहिजे अशी तंबी दिली होती. पण हे खासदार एकही आमदार फोडू शकले नाहीत. आमदार फोडू न शकल्यामुळेही अमित शहांनी त्यांना झापले होते असा दावाही पवारांनी यावेळी बोलताना केला.

 

बातम्या आणखी आहेत...