आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयंत पाटलांनी राष्ट्रवादीसाठी आता \'रोहित शर्मा\' व्हावे- अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जयंत पाटील चांगली फिरकी घेतात, गुगली टाकतात. बॅटिंगही दमदार करतात. काल आयपीएल सामन्यात कर्णधार या नात्याने रोहित शर्माने जसा मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला तसाच विजय जयंतराव तुम्ही राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत मिळवून द्या, अशी फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुण्यातील बैठकीत केली.

 

जयंत पाटील यांची आज दुपारी प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यानंतर अजित पवार बोलत होते. तटकरे यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात पक्षाची संघटना वाढविण्यात त्यांना यश आल्याचे सांगत अजित पवारांनी तटकरेंच्या कारकिर्दीबाबत समाधान व्यक्त केले. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांनी आता राष्ट्रवादीसाठी रोहित शर्मा होऊन विजय मिळवून द्यावा अशी फटकेबाजी केली.

 

अजित पवार म्हणाले, सुनील तटकरेंनी मागील चार वर्षाच्या प्रतिकूल काळात पक्षाची संघटना वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आता जयंतराव यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. आगामी निवडणुकीत जयंतरावांनी वाट्टेल ते करावे पण पक्षाला सत्ता मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नविन व तरूण चेह-यांना संधी देऊन महाराष्ट्र ढवळून काढावा असेही त्यांनी सांगितले. तसेच जे मागील दहा वर्षापासून पदाधिकारी आहेत त्यांनी थोडे मागे थांबून नव्यांना संधी द्यावी असे आवाहनही अजित पवारांनी आपल्या पक्षाला नेत्यांना केले.

 

यावेळी अजित पवारांनी आर आर आबांची आठवण काढली. आबा आज आपल्यात नाहीत. त्यांची कन्या स्मिता हिचा विवाह मंगळवारी (1 मे रोजी) पुण्यातील हडपसरमधील लक्ष्मी लॉन येथे होत आहे. आबांच्या कुटुंबियांनी बहुतेकांना निमंत्रण दिलेच असेल पण तरीही कोणी राहिले असेल तर आपल्या घरातील लग्न समजून स्मिता व तिच्या पतीला आशीर्वाद देण्यासाठी या असे आवाहन अजित पवारांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...