आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाई: \'केसरी\'च्या सेटवर शुटिंगदरम्यान स्टंट करताना अक्षयकुमार जखमी, बरगड्यांना दुखापत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयकुमार 'केसरी' चित्रपटाचे शुटिंग करताना वाई येथे जखमी झाला आहे. - Divya Marathi
अक्षयकुमार 'केसरी' चित्रपटाचे शुटिंग करताना वाई येथे जखमी झाला आहे.

सातारा- बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यांच्या आगामी 'केसरी' चित्रपटाचे शुटिंग वाई येथे सुरू आहे. या शुटिंगदरम्यान स्टंटचा शीन करताना अक्षय कुमार जखमी झाला. त्याच्या बरगड्यांना चांगलाच मार लागून दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर डॉक्टरांनी अक्षयकुमारला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अक्षयने डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावत चित्रपटांचे शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

मागील महिन्यभरापासून अनुराग सिंह दिग्दर्शित केसरी चित्रपटाचे शुटिंग साता-यातील वाई-पाचगणी परिसरात सुरू आहे. या चित्रपटात एक स्टंटचा आहे. तो स्टंट सीन दिग्दर्शित करताना अक्षयकुमार जमिनीवर जोरात पडला. त्यामुळे त्याच्या छातीला व बरड्यांना खरचटले व दुखापत झाली.

 

दरम्यान, या घटनेनंतर डॉक्टरांनी अक्षयकुमारला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शक अनुराग सिंग यानेही अक्षयने तत्काळ मुंबईत जाऊन काही उपचार व विश्रांती घ्यावी असे सांगितले. त्यासाठी एक चॉपरही तयार ठेवले गेले. मात्र, खिलाडी अक्षयने मुंबईला न जाता वाईतच थांबून आराम करण्याचा निर्णय घेतला. एक- दोन दिवसात तो पुन्हा शुटिंग सुरू करणार आहे. 

 

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असणारा हा सिनेमा 1897 साली ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांच्यात झालेल्या सारागढच्या युद्धावर आधारित आहे. यात अक्षयची प्रमुख भूमिका असून, तो हवालदार ईश्वर सिंग यांची भूमिका साकारत आहे. अक्षयच्या 'केसरी' सिनेमात नायिका म्हणून परिणिती चोप्रा दिसणार आहे. केसरी हा सिनेमा 21 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...