आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते १६ जुलैला पुरस्कार वितरण हाेणार अाहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "पाच दशकाहून अधिक काळ माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना चपळगावकर यांच्याविषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि चपळगावकर यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्द्ल त्यांची निवड करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...