आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमधील 76 घरांवर प्राधिकरणाचा हातोडा; रस्त्याच्या रुंदीकरणासाठी केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी आज प्राधिकरण विभागाकडून तब्बल 76 घरांवर हातोडा चालविण्यात आला. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरीता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास 74 घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोझर फिरविण्यात आला आहे. यामध्ये एक  इमारत देखील जमीनदोस्त करण्यात आली आहे. 

 

 

रावेत-वाल्हेकरवाडी या 34.5 मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून वाल्हेकरवाडी रावेत मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते ओढ्यापर्यंतची घरे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने भुईसपाट केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून त्याकरीता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील जवकपास 76 घरांना प्राधिकरणाने नोटीसा बजावल्या. रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने 01 जानेवारी रोजी घऱ खाली करण्याची अंतिम नोटीस बजावली होती. त्यानंतर आज या घरांवर आज बुलडोझर फिरवण्यात आला. यामध्ये 5 पक्की घरे आणि 70 पेक्षा जास्त तापुरत्या स्वरूपातील पत्रा शेड व कच्च्या स्वरूपाची घरे होती. ज्या नागरिकांची घरे यामध्ये गेली आहेत, त्या नागरिकांना नवीन सदनिका मिळवून देण्यासाठी आम्ही प्राधिकरण सभेत ठराव मांडणार आहोत, अशी माहिती उपअभियंता अनिल दुधलवार यांनी दिली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...