आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेत नाचण्यावरुन दोन गटात हाणामारी, 16 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, 5 अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यात्रेत तमाशा सुरु असताना नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या भांडणामुळे 16 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील मामुर्डी गावी घडली. प्रमोद गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी गावात भैरवनाथ यात्रा सुरु आहे. यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोमवारी रात्री तमाशा ठेवण्यात आला होता. तमाशातील लावणीवर गावातील तरुणाई थिरकत होती. दरम्यान नाचत असताना दोन गटातील मुलांची किरकोळ धक्काबुक्की झाली. याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यावरून धक्काबुक्की व मारहाण करणा-या 16 जणांविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...