आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 शस्त्रक्रियांनंतरही निदान चुकले, अाॅस्ट्रेलियन डाॅक्टर रुग्णाला पुण्यात दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पचनप्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्याच्या ठिकाणी झालेल्या बिघाडाचे नेमके निदान करता न आल्याने अनेक वर्षे यातना सोसणाऱ्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरवर पुण्यातील प्रॉक्टोसर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी नेमके निदान करून अल्पावधीत उपचार केल्याने रुग्णाला दिलासा मिळाला. मूळ बांगलादेशी असणाऱ्या डॉ. आमीर यांनी स्वत:च पत्रकारांना ही माहिती दिली.   


डॉ. आमीर म्हणाले,‘तीन वर्षांपासून मी पचनविकाराने ग्रस्त होतो. मलविसर्जनानंतर मला अतितीव्र वेदना होत असत. या त्रासासाठी मी ऑस्ट्रेलियातील सहा तज्ज्ञांकडून तीन वर्षे उपचार घेतले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या. तब्बल आठ शस्त्रक्रिया केल्या..पण त्रास कमी झाला नाही. कुणालाही माझ्या त्रासाचे, आजाराचे निदान करता आले नाही.

 

अशा परिस्थितीत मला इंटरनेटवर पुण्यातील प्रॉक्टोसर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांची माहिती समजली. माझ्या त्रासाविषयीची सर्व माहिती मी त्यांना ईमेलद्वारा पाठवली. त्याआधारे मला नेमका काय त्रास होत आहे, याचे नेमके निदान करून डॉ. पोरवाल यांनी उपचारांची सविस्तर माहिती तर पाठवलीच, पण मी पूर्ण बरा होईन, हा आत्मविश्वासही दिला. त्यामुळे मी आश्वस्त झालो आणि उपचारांसाठी पुण्यात आलो. डॉ. पोरवाल यांनी अल्पावधीत मला बरे केले.’   


डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले,‘डॉ. आमीर यांना अॅनल अॅबसेस हा विकार होता. सोप्या भाषेत सांगायचे, तर अॅबसेस म्हणजे बंद पोकळीत साचलेला पू. पचनक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात शरीर नको असलेला भाग मलरूपात बाहेर टाकते. त्यासाठी गुदाशय आणि बाह्य त्वचेमध्ये विशिष्ट पोकळी असते. डॉ. आमीर यांच्या या पोकळीत हा पू साठून राहिला होता. या पोकळीतील स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांच्यावर जे उपचार झाले, ते तात्पुरत्या स्वरुपाचे होते कारण निदान नेमके हाेत नव्हते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘कॉम्प्लेक्स रिकरंट अॅबसेस’ असे म्हणतात. 

 

डीएलपीएल तंत्रज्ञानाने एका दिवसात उपचार   
‘कॉम्प्लेक्स रिकरंट अॅबसेसवर उपचार करताना पोकळीच्या वर्तुळाकार स्नायूंना कोणतीही इजा पोचणार नाही, तसेच पोकळीत कुठेच साठलेला पू शिल्लक राहणार नाही, सर्व जखमा भरतील, याची काळजी काटेकोरपणे घ्यावी लागते.  त्यासाठी डिस्टल लेसर प्रॉक्झिमल लिगेशन (डीएलपीएल) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे उपचार एका दिवसात शक्य होतात. त्यात जिस्पोजेबल फिलॅक लेसर फायबरचा वापर केला जातो. त्यासाठी थ्री डी एन्डो अॅनल पेल्विक इमेजिंग तंत्रज्ञान वापरले. गुदाशय आणि वर्तुळाकार स्नायूंच्या त्रिमितीय प्रतिमा त्यातून मिळवल्या.  त्यातून अॅबसेसचे नेमके स्थान समजते. लेसर फायबरच्या साह्याने मग ते नष्ट करता येते. डॉ. आमीर यांच्यावर हे उपचार केले,’ अशी माहिती डाॅ. पाेरवाल यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...