आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड: बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी पोलिसांच्‍या साहाय्याने पकडला गोमांसने भरलेला टेम्‍पो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- पुणे- मुंबई महामार्गावर गोमांस घेऊन जाणारा टेंपो आज मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतला. यामध्‍ये 6 टन गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्‍यात आली आहे. शहरात गोमांस भरून एक टेम्‍पो जात आहे, याची खबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्‍यांनी हा टेम्‍पो पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिला. पिंपरी पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत ही घटना घडली. 

 

अहमदनगर येथून कुरेशी हॉटेलच्या मागच्या गल्लीतून गायी व बैलांची कत्तल करून त्यांचे मांस मुंबईमध्‍ये विक्री करण्‍यासाठी हा टेम्‍पो निघाला होता. याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर गोरक्षकांनी जुना पुणे-मुंबई रस्त्यावर सापळा रचून हा टेम्पो थांबविला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्‍यांना सर्व माहिती दिली. तसेच टेम्पो व चालक यांना पोलीस स्टेशनमध्‍ये आणले.  


पोलिसांनी टेम्‍पो ड्रायव्हर अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद इंद्राशी यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी अहमदनगर येथून गायी व बैलांची कत्तल करून टेम्पो मुंबई येथील गनीभाईकडे घेऊन जात आहोत, असे सांगितले. त्यानंतर पशुवैधकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्‍ये गायी व बैलांचे मुंडकी, मोठे मांस व पाय त्‍यांना दिसले. याप्रकरणी कसायांना सहकार्य करणा-या शेतक-यासह गायी कापणारा, गोमांस विकत घेणारा गनीभाई, ड्रायव्‍हर व गाडीमालक यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. 

 


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...