आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये आता बाळासाहेबांचा पुतळा, आदित्यने केले अनावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेबांच्या पुतळ्यासमवेत सुनील कंडलूर आणि आदित्य ठाकरे.... - Divya Marathi
बाळासाहेबांच्या पुतळ्यासमवेत सुनील कंडलूर आणि आदित्य ठाकरे....

पिंपरी-चिंचवड- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा  मेणाचा पुतळा लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये दाखल झाला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच त्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा बनवण्यासाठी सुनील कंडलूर यांना तीन महिने लागले. सिंहासनावर बसलेल्या बाळासाहेबांचा मेणाचा पुतळा सुनील यांनी अगदी हुबेहूब असा साकारला आहे.

 

भारतातील पहिले वॅक्स म्युझियम केरळ येथील वॅक्स कलाकार सुनिल कंडलूर यांनी लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम या नावाने सुरु केले आहे. गेल्या दहा वर्षात राजकीय क्षेत्रातील शरद पवार, गोपीनाथ मुंडे, अण्णा हजारे, क्रिकेटर कपिल देव, अभिनेते अमिताभ बच्चन, जॉकी श्राफ, पॉप गायक मायकल जॅक्सन अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या 90 हून अधिक सेलिब्रेटींचे हुबेहुब मेणाचे पुतळे या वॅक्स म्युझियममध्ये कलावंत सुनिल कंडलूर यांनी साकारले आहेत.

 

दीड वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला झिंगाट करून सोडणाऱ्या आर्ची आणि परश्या रातोरात स्टार झाले. त्यामुळे सुनील यांनी त्या दोघांचेही मेणाचे पुतळे काही दिवसापूर्वी बसविले आहेत. आता त्यात महाराष्ट्राच्या माणसा-माणसांत आदराचे स्थान मिळवलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा पुतळा बसविण्यात आला आहे. सिंहासनावर विराजमान असलेल्या बाळासाहेबांचा पुतळा पाहण्यासाठी म्युझियममध्ये लोक गर्दी करत आहेत, अशी माहिती सुनील कंडलूर यांनी दिली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...