आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बारामती - दाेन वर्षांपासून उन्हाळ्यात नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने पिके जळत असल्याचा अाराेप करत इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी आणि इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे संचालक वसंत साेपान पवार (४८) यांनी शनिवारी घराजवळील विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस अाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली अाणि मुलगा असा परिवार अाहे.
वसंत पवार यांनी शेतीसाठी काही कर्ज घेतले हाेते. मात्र पाण्याअभावी पिके येत नसल्याने कर्ज फेडणे अशक्य हाेत असल्याच्या विवंचनेत अापण अात्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले अाहे. यासाठी राज्य सरकार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या जबाबदार उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर अापल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, असे पवार यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिले अाहे. तसेच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून सरकारला वठणीवर अाणावे, असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले अाहे. शेजारच्या लासुर्णे गावात पवार हे कीटकनाशकांचे दुकानही चालवायचे.
अांदाेलन करण्याचा दिला हाेता इशारा
बारामती व इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होते. हे सर्व पीक नीरा नदीच्या डाव्या कालव्यातील पाण्यावर अवलंबून अाहे. मात्र गेल्या दाेन वर्षांपासून जलसंपदा विभाग पाणी साेडत नसल्याच्या निषेधार्थ वसंत पवार यांच्यासह काही शेतकऱ्यांनी १३ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जलसंपदा अधिकाऱ्यांनी अाश्वासन देऊन हे अांदाेलन थांबवले हाेते. मात्र अाश्वासनाची पूर्तता न झाल्याने पवार यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.