आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • बँक ऑफ महाराष्‍ट्रचे अध्‍यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर, Bank Of Maharashtra Chairman Ravindra Marathes Bail Granted

DSK गैरव्यवहार: बँक ऑफ महाराष्‍ट्राचे अध्‍यक्ष रवींद्र मराठेंना दिलासा, जामीन मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डीएसके कर्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी बुधवारी दिले. दरम्यान, बँकेच्या आजी-माजी आधिकाऱ्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 


कोर्टाने मराठेंना जामीन मंजूर करताना अटी घातल्या आहेत. त्यात मराठे यांनी कोर्टाच्या परवानगीविना भारत सोडून जाऊ नये, तपासात हस्तक्षेप करू नये, पोलिसांना सहकार्य करावे तसेच तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर हजर राहावे, सध्या वापरत असलेला मोबाइल क्रमांक व राहता पत्ता तपास अधिकाऱ्यांना द्यावा, या अटींचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...