आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा-सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात 'रॉबिनहूड’प्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरु वाटेगावकर यांचे आज निधन झाले. गावोगावी त्यांना जीव लावणाऱ्या असंख्य बहिणींनी आपला भाऊ गमावला. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.
असे झाले पश्चिम महाराष्ट्राचे 'रॉबिनहूड’
कृष्णा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये गावातील गावगुंड गोर-गरीब जनतेवर अन्याय-अत्याचार करत त्यांना गुलामाची वागणूक देत होते.गरिबांच्या लेकी-सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या.प्रचंड दहशत, टवाळखोर गुंडांची टोळी याच्या बळावर त्या गावगुंडानी थैमान घातले होते. जाब विचारणारा कोणी नव्हता. दाद मागायचे धाडस कोणात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याच गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारा धनगराचा पोर पुढे सरसावला याच पोराचे नाव 'बापू बिरू वाटेगावकर'.
काही दशकापूर्वी गावगुंडांची मुजोरी मोडून काढून, बापू बिरु वाटेगावकर यांनी सांगली परिसरात रक्तरंजीत इतिहास रचला. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्यांची खांडोळी करुन, गरिबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला. अनेक वर्षे पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र माळरानावर, ऊसाच्या शेतात, डोंगर दऱ्यात राहून बापूंनी अनेक दशकं पोलिसांना चकवा दिला. नामांकित पैलवान असलेले आप्पा जवळपास 25 वर्षे भूमिगत राहिले. एकेदिवशी त्यांना पोलिसांनी पकडले आणि न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांना समाजप्रबोधनाचे काम केले. त्यांच्या जीवनावर बापू बिरू नावाचा चित्रपटही निघाला होता. मिलिंद गुणाजी यांनी त्यात बापू बिरूंची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.